पुणे : मानवी जीवन जगत असताना निरोगी राहता यावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण काहीना काहीतरी आजार, समस्या भेडसावतातच. त्यात दमा हा एक असा आजार आहे, त्याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर तर ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे योग्यवेळी वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला देण्यात येतो.
पण हा दमा नेमका कसा होतो, हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. दमा हा धूर, धूळ, सिगारेट आणि वात प्रदूषण यांमुळे होऊ शकतो. याशिवाय, थंड आहार, सायनुसायटिस, सर्दी, सतत खोकला झाल्यास दम्याचा आजार बळावू शकतो. मानसिक तणाव, जागरण, अति श्रम, रक्ताची कमतरता, टीबी, हृदयरोग यासह आनुवंशिकता हेदेखील यामागचे कारण आहे.
दम्यावर घरगुती उपचार काय?
– खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अॅटॅक कमी होतो.
– मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो.
– रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो.
– हृदयरोग नसणाऱ्या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.
– आद्रक आणि मध घ्यावे.
काय करू नये?
एसी किंवा कूलरमध्ये झोपू नये. धूम्रपान, कफ वाढवणारा आहार टाळावा. दही, साबुदाणा, केळी, थंड पेय इत्यादींचे सेवन करू नये. रात्री जागरण, थंड हवेत फिरणे टाळले पाहिजे. दम्याच्या रुग्णांचे पोट नेहमी साफ राहिले पाहिजे. बद्धकोष्ठता होणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे.