Health News : डासांपासून एक गंभीर आणि भयानक आजार पसरतो तो म्हणजे डेंग्यू. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चावण्याने होतो. हा डेंग्यू साधारणपणे पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत होतो. म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या डासांसाठी पोषक असे हवामान असते. कारण या हंगामात डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल परिस्थिती असते.
एडिस इजिप्ती हा डास लावल्याने डेंग्यूचा ताप येतो. हा डास रुग्णाच्या रक्तात डेंग्यूचे विषाणू जास्त प्रमाणात सोडतो. डेंग्यूचा विषाणू वाहणारा डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा हा विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात पसरतो. त्यामुळे त्याला डेंग्यूच्या विषाणूची लागण होते. पण हा डेंग्यू झाल्यावर किंवा त्याची लक्षणे जरी जाणवली तरी विशेष काळजी घ्यावी लागते.
डेंग्यूचा प्रसार कसा होतो?
डास चावल्यानंतर याचा मुख्यत: प्रसार होतो. साधारणपणे 3-5 दिवसांनी डेंग्यू तापाची लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागतात. शरीरात रोग विकसित होण्याचा कालावधी 3 ते 10 दिवसांचा असू शकतो.
काय काळजी घ्यावी?
– डेंग्यूची लागण टाळण्यासाठी, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या मजबूत आणि भावनिक संतुलित राहणे गरजेचे असते. चांगलं खावे आणि नीट झोपा.
– जेवणात हळदीचा अधिक वापर करा. अर्धा चमचा हळद सकाळी पाण्यासोबत किंवा अर्धा चमचा हळद रात्री एक ग्लास दुधासोबत घ्या. पण जर तुम्हाला सर्दी, खोकला इत्यादी त्रास होत असतील तर दूध घेऊ नका. त्यानंतर तुम्ही हळद पाण्यासोबत घेऊ शकता.
– आठ-दहा तुळशीच्या पानांचा रस मधात मिसळून घ्यावा किंवा 10 तुळशीची पाने चतुर्थांश ग्लास पाण्यात उकळा. जेव्हा ते अर्धे झाले की ते पाणी प्या.
व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचे अधिक सेवन करा.
काय घ्यावेत उपचार?
– जर रुग्णाला साधा डेंग्यू ताप असेल तर घरी उपचार व काळजी घेता येते.
– डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही पॅरासिटामॉल (क्रोसिन इ.) घेऊ शकता.
– अॅस्पिरिन (डिस्प्रिन) घेऊ नका. हे प्लेटलेट्स कमी करू शकतात.
– नेहमीप्रमाणे आहार घेणे सुरू ठेवा. ताप आल्यास शरीराला अन्नाची जास्त गरज असते. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. शक्य तेवढी विश्रांती घ्या.