Health मुंबई : पुदिना हा आरोग्यास फायदेशीर असा घटक मानला जातो. पुदिन्याच्या पानांचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.(Health) सरबत किंवा इतर काही पेयांमध्येही याचा वापर होताना दिसत आहे. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी चांगलाच फायदेशीर आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्येही त्याचा फायदा होतो. (Health)
पुदिनाचा चहा तर विशेष फायदेशीर ठरतो. दररोज एक कप पुदिन्याचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. पुदिन्याचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहतेच. शिवाय, हा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून वजन कमी होण्यास मदत होते. पुदिन्याच्या चहामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वास ताजातवाना ठेवण्यास मदत करतात. पुदिन्याची पाने चावून खाल्ल्यानेही त्याचा फायदा होतो.
वेदना कमी करण्यास फायदेशीर
पुदिन्याची पाने स्नायूंना आराम देतात, असे म्हटले जाते. तसेच हाच पुदिना शरीरातील वेदनाही कमी करतो. त्याच्या पानांमध्ये मेन्थॉल कंपाऊंड असते, जे डोकेदुखीवर आरामदायी असतो.
मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत
पुदिन्याच्या पानांमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, ज्याचा आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो. पुदिन्यामधील मेन्थॉल कंपाऊंड या गुणधर्मामुळे मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याचा चहा बनवून प्यायल्यास आराम मिळू शकतो.