पुणे : सध्याच्या धावपळीचे आयुष्यात आहाराची काळजी घेणे गरजेचं असते. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सतत लॅपटॉप बसल्यामुळे लठ्ठपणा सुद्धा वाढतो. आणि मग वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच जण डाएटचा आधार घेतात. वजन कमी कारण्यासाठी ‘फिस्ट डाएट’ तुम्हाल मदत करू शकतं. जाणून घ्या ‘फिस्ट डाएट’ काय आहे
यामध्ये एक गोष्ट पाळली पाहिजे की तुम्ही जे अन्नपदार्थ खाता त्यामधून प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक मिळाले पाहिजेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश होतो. या डाएटचे पालन केल्यामुळे व्यक्ती प्रत्येक आठवड्यात ४०० ते ९०० ग्रॅम वजन कमी करू शकतो.
फिस्ट डाएट मध्ये तुम्ही तुमच्या शरीरासाठी जेवढ्या कॅलरीज योग्य आहेत तेवढ्या कॅलरीजचे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करून तुमचा वजन कमी करू शकता. यामध्ये तुम्ही दिवसातून तीन वेळा जेवण करु शकता किंवा अन्नपदार्थ खाऊ शकता.
जेव्हा तुम्ही फिस्ट डाएट करता तेव्हा तुम्हाला व्यायाम किंवा कसरत करण्याची गरज नाही. पण तज्ज्ञ व्यायाम सुदृढ शरीरासाठी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. जर का तुम्ही या डाएट सोबत नियम आणि योग्य व्यायाम सुद्धा केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसेल.
तुम्ही कोणतेही डाएट जेव्हा फॉलो करत असता तेव्हा त्याचे काही नियम तुम्हाला पाळावे लागतात. जर का तुम्ही एखादं डाएट करत असता आणि इतरही काही पदार्थ खात असाल तर तुम्हाला त्या डाएटचे चांगले परिणाम दिसणार नाहीत. फिस्ट डाएट करताना मिठाई, चॉकलेट आणि फास्ट फूडचे सेवन करणे टाळा.
(ही बातमी फक्त माहिती म्हणून दिली आहे. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता)