पुणे : Health – साखरेपेक्षा गूळ खाणे कधीही चांगले कारण तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Health)कदाचित काही लोकांना थेट गूळ खाणे आवडणार नाही. मात्र ते गुळाची पोळी बनवून ती खाऊ शकतात. जाणून घ्या गुळाची पोळी खाण्याचे फायदे… (Health)
१. गुळाच्या पोळीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. गुळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील ऍसिड कमी होण्यास मदत होते..
२. निरोगी राहायचे असेल तर रोज गूळ खाण्याच्या सल्ला तज्ज्ञ देतात. गुळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६ ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय गुळामध्ये फॅटचे प्रमाणही नगण्यच असते. त्यामुळे गुळाची पोळी खाल्ल्याने वजनही वाढत नाही.
गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीमुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. गुळाची पोळी खाल्ल्याने हाडांची रचना सुधारून हाडेही मजबूत होतात.
३. मासिक पाळीदरम्यान गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. शिवाय शरीरास आवश्यक पोषक घटक गूळ पोळीमध्ये आढळतात.
४. गुळातील औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.
आरोग्याच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे
Health : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असेल तर या पदार्थांचा आहारात करा समावेश
Health Care | या आजारांवर आंबेहळद गुणकारी, जाणून घ्या कसा करावा वापर