Health पुणे : मानवी शरीराला साधारणपणे 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. (Health) ही झोप पूर्ण झाल्यास काही आजार, त्रासापासून दूर राहता येऊ शकते. (Health) मात्र, झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला व्हर्टिगो हा त्रास होऊ शकतो. (Health) एक संशोधन करण्यात आले होते. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. (Health)
‘स्लीप डिस्टर्बन्सेस अँड व्हर्टिगो : ए बायडायरेक्शनल रिलेशनशिप’ या नावाचा एक अभ्यास ‘जर्नल ऑफ वेस्टिब्युलर रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला. त्यानुसार, ज्या रुग्णांना को-मोर्बिड कार्डिओमेटाबॉलिक आजार आहेत, त्यांच्यामध्ये अपुऱ्या झोपेचा व्हर्टिगोच्या परिणामाबरोबर संबंध दिसून आला आहे. त्यामुळे पुरेशी झोप घेणे गरजेचे बनले आहे.
तज्ज्ञ डॉक्टर सांगतात…
याबाबत दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. एन. रेन्जेन यांनी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘हा संबंध दर्शवणारी यंत्रणा पूर्णपणे समजलेली नाही. मात्र, असे गृहीत धरले जाते की, झोपेच्या कमतरतेमुळे व्हेस्टिब्युलर सिस्टीमवर परिणाम होतो, जे संतुलन आणि स्पेशिअल ओरिएंटशन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
व्हर्टिगो म्हणजे काय?
व्हर्टिगो म्हणजे हा एक चक्कर येण्याचा विशेष प्रकार आहे. ज्यामध्ये तु्म्ही स्थिर असला तरी तुमचं डोकं गरगरत असल्याची खोटी जाणीव होते. हा त्रास काहींना लवकर जाणवतो. मात्र, पुरेश झोप घेऊ न शकणाऱ्यांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘ही’ लक्षणे जाणवल्यास घ्या काळजी
गरगरणे किंवा चक्कर येणे हे व्हर्टिगोचे प्राथमिक लक्षण आहे. ही संवेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते. जेव्हा तुम्ही हालचाल करता किंवा डोके हलवता तेव्हा जाणवू शकते. व्हर्टिगोच्या लक्षणांमध्ये अनेकदा मळमळल्यासारखेही वाटते. तर काहींना उलट्या देखील होऊ शकतात.