पुणे : जेव्हा कधी आपण प्रवासात असताना किंवा घरी निवांत असताना भुईमुगाच्या शेंगा खाणे पसंत करतो. अनेक लोकांना या शेंगा काम करत असतानाही हव्या असतात, पण तुम्हाला माहिती आहे का की, याच भुईमुगाच्या शेंगा खाण्याची सवय तुम्हाला एका मोठ्या आजारापासून वाचवू शकते. तर हा आजार नेमका कोणता आहे आणि त्यातून आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो, याची आपण माहिती घेणार आहोत.
भुईमुगाच्या शेंगा खाण्याची सवय ही तुम्हाला हृदयविकाराच्या घातक आजारापासून वाचवू शकते. त्यासाठी फार भुईमुगाच्या शेंगा खाण्याची गरज नाही तर दररोज 4-5 शेंगा खाल्ल्या तरीही ते आरोग्याला पुरेसे आहे. ही माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनात जो व्यक्ती सातत्याने दररोज 4- 5 भुईमुगाच्या शेंगा खातो त्याला इतरांच्या तुलनेत आजार होण्याची शक्यता कमी असते, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
आता भुईमुगाच्या शेंगा या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे. या संशोधनाचे अध्ययन हे स्ट्रोक या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. भूईमुगाच्या शेंगांमध्ये हृदयविकाराला आळा घालण्याची क्षमता असते. त्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असल्याने त्याचा शरीराला फायदा होत आहे. शेंगांमधील मोनोअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड, पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड, मिनरल्स, विटामिन आणि फायबरचा समावेश असल्याने त्यातून शरीराला योग्य ती पोषकतत्वे मिळतात.