Health Care | आंबेहळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली मानली जाते. सामान्य हळदीपेक्षा आंबेहळद अनेक आजारांवर प्रभावी आहे. जाणून घ्या आंबेहळद कोणकोणत्या आजारांवर प्रभावी आहे.
आरोग्यासाठी अत्यंत चांगली…
१. मुक्कामार, सूज आल्यावर, रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.
२. शरीरावर गाठ आल्यास, आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.
३. आंबेहळद आणि दूध किंवा मलई एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. शरीरावर काळसर डाग पडले असतील तर त्यावर आंबेहळद नियमिपणे लावल्याने डाग कमी होतात. तसेच अंगावर पुरळ आले असतील, खाज येत असेल तर त्या भागावर आंबेहळदीचा लेप लावावा.
४. लचकणे, मुरगळणे, सूजणे यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास, वेदना कमी होतात.
टीप – आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे
Health Care | ;या घरगुती उपायांनी घालवा टाचदुखी
Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे