Health Care| ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते.
जाणून घ्या ताडगोळे खाण्याचे फायदे –
१. ताडगोळ्यांच्या सेवनाने त्वचाविकार कमी होतात. ताडगोळ्यांपासून फेसपॅकही चांगला बनवता येतो. त्यासाठी चंदन उगाळून घ्यावं. त्यात थोडं नारळपाणी आणि ताडगोळा कुस्करून घालावा. याचा तयार झालेला फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावावा.
२. उन्हात जाऊन आल्यानंतर जर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचं पाणी व ताडगोळा चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर गार पाण्याने चेहरा पुसून घ्यावा.
३. ताडगोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.
४. ताडगोळ्यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
५. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची कमतरता ताडगोळ्यांमुळे भरुन निघते.
६. उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो.
७. किडनीचे आरोग्य सुधारते. शरीरातील नको असलेली द्रव्ये याच्या सेवनानं शरीराबाहेर फेकली जातात.
८. कांजण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Tips : सावधान..! ‘या’ भाज्या कच्च्या खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम
Health : आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे
Health : तरुण दिसण्यासाठी प्या कोमट पाणी, जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे