Health Care | गुलाबाचे फुल केवळ सौंदर्यवर्धक नसून त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
जाणून घ्या गुलाबाचे आरोग्यदायी फायदे –
- डोळ्यांची जळजळ होत असेल तर शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे गुलाबजल डोळ्यात घालावे डोळे थंड पडतात. गुलाबजल त्वचेच्या अनेक समस्यांवरदेखील गुणकारी आहे.
- ओठ फाटले असतील किंवा उकलले असतील तर गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यात ग्लिसरीन टाका आणि हे मिश्रण ओठांवर लावा. ओठ गुलाबी आणि मऊ होतील.
- गुलाबाच्या फूलाच्या पाकळ्या खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. हिरड्या आणि दात मजबूत होतात.
- डोके दुखत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या बारीक करुन त्याचा लेप बनवून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.
- कांजण्या झालेल्या व्यक्तीच्या अंथरुणावर गुलाब पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या वाळवून बनवलेले चूर्ण टाका. त्यामुळे कांजण्या झालेल्या व्यक्तीच्या शरीराला थंडावा आणि अराम मिळेल.
- गुलाबामुळे अनिद्रेची समस्या दूर होते. झोप येत नसेल तर, डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे ‘हे’ करा
Healthy Tips | ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा टाचदुखीपासून सुटका