राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : दौंड तालुका पत्रकार, संघ दौंड तालुका सोशल मिडीया पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय यवत यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दौंड तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त दौंड तालुक्यातील सर्वपत्रकार व कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय यवत येथे शनिवारी (ता. ०३) संपन्न झाले.
या शिबीरात रक्त तपासणी , शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन तपासणी, ईसीजी तपासणी, आवश्यकतेनुसार एक्सरे काढून औषधे देण्यात आली. यावेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी पत्रकारांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
दरम्यान, यापुढील काळातही पत्रकारांसाठी याप्रकारच्या शिबीरांचे आयोजन करण्यात येईल असे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत इरवाडकर म्हणाले.
यावेळी दौंड तालुक्यातील अनेक पत्रकार बंधू, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जाधव, डॉ. राक्षे, यांसह रुग्णालयातील अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.