पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण, काही आजार, समस्या नकळतपणे भेडसावत असतात. त्यापासून दूर राहण्यासाठी वैद्यकीय सल्ला, उपचार घेतले जातात. मात्र, काही घरगुती उपायही फायद्याचे ठरू शकतात. त्यात जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिड वाढलं असेल तर तुम्ही आहारात थोडा बदल करून ते नियंत्रणात आणू शकता.
युरिक अॅसिड हे शरीरातील प्युरीन नावाच्या पदार्थाच्या विघटनाने तयार होणारे टाकाऊ पदार्थ आहे. मांस, बिअर आणि वाईनमध्ये प्युरिन आढळतात. ते रक्तात विरघळते आणि मूत्रपिंडांद्वारे लघवीसह शरीराबाहेर येते. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी, किडनीचे आजार, हृदयविकाराचा झटका इत्यादी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे बाजरी.
तुम्ही घरच्या घरी बाजरीपासून बनवलेली भाकरी खाऊनही युरिक ॲसिडची पातळी कमी करू शकता. बाजरी हे भरड धान्य आहे आणि त्यापासून बनवलेल्या रोटी खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. तुम्ही बाजरीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. बाजरीची रोटी किंवा खिचडी बनवूनही खाऊ शकता. बाजरीत काही विशेष गुणधर्म आहेत, जे युरिक अॅसिडपासून बचाव करण्यास मदत करतात.
प्युरिनच्या विघटनाने युरिक अॅसिड तयार होते. शरीरात प्युरीनचे प्रमाण जास्त असल्यास युरिक अॅसिड वाढू शकते. बाजरीचे सेवन केल्याने प्युरीनचे प्रमाण कमी होते. युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासोबतच बाजरीची भाकरी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. बाजरीची भाकरी पचन सुधारण्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य, मधुमेह नियंत्रण आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय बाजरी हाडे, त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते.