पुणे : उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून बचाव करायचा असेल तर तुम्हीही चंदनाचा पारंपरिक उपाय करू शकता. शतकानुशतकं आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये चंदनाचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यातही याचा वापर केला जातो. चंदनाचा वापर केल्यामुळे त्वचेची टॅनिंग कमी होते. उन्हाळ्यात, तीव्र उन्हापासून, उष्णतेच्या लाटांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांमध्यही, चंदन हा थंडावा देणारा सर्वोत्तम नैसर्गिक घटक मानला जातो.
चंदन त्वचेला थंड ठेवण्याबरोबरच मानसिक ताण कमी करण्यासही उपयुक्त ठरते. चंदनामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, यामुळे संसर्गापासून त्वचेचं संरक्षण होतं. उन्हाळ्यात, तुम्ही चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून त्याचा फेस पॅक करून लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग, पुरळ आणि मुरुमांचं प्रमाण कमी होतं.
तसेच उन्हाळ्यात उष्माघाताचा धोकाही अधिक असतो. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी चंदनाची पेस्ट चांगला पर्याय आहे. पाठीवर, छातीवर, कपाळावर चंदनाची पेस्ट लावल्यानं शरीर थंड होतं आणि उष्माघाताचा धोका कमी होतो. पाण्यात चंदन पावडर मिसळून आंघोळ केल्यानं शरीर थंड होतं आणि उष्णतेमुळे येणाऱ्या पुरळांपासून बचाव करता येतो.
(टीप: सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. पुणे प्राईम न्यूज कुठलाही दावा करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.)