आपल्यापैकी अनेकजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असतील. लठ्ठपणा ही आजच्या काळातील एक मोठी समस्या बनत आहे. भारतातील कोट्यवधी लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पोटाची चरबी केवळ तुमचे व्यक्तिमत्व खराब करत नाही तर अनेक आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी मेथीचे गुणकारी ठरू शकतात. मेथीच्या दाण्यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास आणि बाहेर पडलेले पोट कमी होण्यास खूप मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर असते. त्यामुळे त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. फायबर व्यतिरिक्त, मेथीच्या दाण्यांमध्ये तांबे, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शियम, लोह आणि फॉलिक ॲसिड देखील चांगले असते जे शरीराला आतून अनेक फायदे देतात.
ग्लासमध्ये दाणे टाकून करावे सेवन
मेथीचे दाणे खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रात्री 1 ते 2 चमचे मेथीचे दाणे एका ग्लासमध्ये टाकून रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे भिजवलेले धान्य असलेले पाणी हलके गरम करून गाळून प्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणेही खाऊ शकता किंवा या बियांपासून फेस पॅक किंवा हेअर मास्क बनवून लावू शकता.