Health Tips : जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित असाल. तरीही तुम्हाला सारखी तहान लागत असेल, तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. विशेषत: हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर, याकडे दुर्लक्ष करु नका. खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आरोद्यााची काळजी घ्या. पाणी हा अतिशय आवश्यक घटक आहे. जगण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. योग्य आणि सकस आहारासोबतच पाणी पिऊन शरीर हाटड्रेट ठेवणेही तितकेच गरजेच आहे.
कॅल्शियमचे प्रमाण घटणे
हायपरक्लेसीमियामुळे शरीराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. तुम्हाला हायपरकॅल्सेमिया असला तरीही तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागू शकते. हायपरकॅल्सेमिया म्हणजे तुमच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे. हायपरकॅल्सेमिया असल्यास उपचार घेण्याची आवश्यकता असते.
मधुमेह
जेव्हा रुग्णाला मधुमेह असतो, तेव्हा त्याला वारंवार तहान लागते. जेव्हा लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडू लागते, तेव्हा शरीराची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि वारंवार लघवी करावी लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि त्यामुळे वारंवार तहान लागते.
अशक्तपणा
तुमच्या शरीरात अशक्तपणा असतो म्हणजेच रक्तामध्ये आरसीबी आणि हिमोग्लोबिनची कमतरता असते, तेव्हा तुम्हाला सारखी तहान लागू शकते. रक्त कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. यासाठी व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची कमतरता असू शकते. यामुळे ॲनिमिया होतो. त्यामुळे शरीर खूप थकल्यासारखे आणि अशक्त वाटू लागते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.
तोंडात लाळेचा अभाव
तोंडात नेहमी लाळ किंवा थुंकी असावी. लाळ अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव मारते. त्यामुळे संसर्गासंबंधीच्या अनेक आजारांपासून बचाव होतो. पण जर तोंडात लाळ कमी होत असेल तर तोंड कोरडं होऊन त्यामुळे वारंवार तहान लागते. यामागे अनेक कारणे असू शकतात. काही औषधे खाल्ल्यानंतर तोंडात कमी लाळ तयार होते. त्याशिवाय कर्करोगासारख्या गंभीर आजारामुळे तोंडात कमी लाळ निर्माण होते. तोंडात लाळेचे उत्पादन कमी होत असेल तर ती चिंतेची बाब आहे.