मुंबई : चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पोटाचे विकार वाढतात. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जाही कमी होते. त्यामुळे तज्ज्ञ सकाळचा नाश्ता हा योग्य आहाराने करावा असा सल्ला देतात. मात्र, नाश्ता करण्याआधीही असे काही पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळू शकते. काही जण सकाळचा नाश्ता हा भरपेट करतात. पण ही पद्धत चुकीची आहे.
‘नाश्ता करण्याआधी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे. हे पदार्थ पॉवर बुस्टर म्हणून काम करतात. तसेच, शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
केळी : रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. त्वरित ऊर्जा मिळते. नियमित सकाळी एक केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. शिवाय दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अशावेळी आपण उलट सुलट खाणं टाळतो.
भिजवलेला सुका मेवा : उत्तम आरोग्य हवं असेल तर, सकाळी न चुकता भिजवलेला सुका मेवा खा. दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासह रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले काजू, बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते. यामुळे पोषक तत्वांचे शोषण वाढवते. शिवाय, पचनक्रिया सुधारते.
भाज्यांचा रस : रिकाम्या पोटी भाज्यांचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. शरीरातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढू शकते. शिवाय यामुळे शरीर हायड्रेट तर होते. यासह बॉडी डिटॉक्स करण्यास मदत करते.
पपई : नाश्ता करण्याआधी नेहमी एक बाऊल पपई नक्की खा. यामधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पपई खाणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
बडीशेप : बडीशेप खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारखे समस्या दूर होतात. आपण सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचा चहा तयार करून पिऊ शकता. यामुळे अपचनापासून आराम मिळतो. पोटाच्या आरोग्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरते.
भिजवलेले मनुके : भिजवलेले मनुके हे उर्जेचं उत्तम स्त्रोत आहे. यासह पचनक्रिया सुधारते. सकाळी मनुके खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. यातील आयर्न ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो.