जेवणात मीठाला खूपच अधिक महत्त्व आहे. कारण त्याच्या शिवाय जेवणाला चवच येऊ शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का की मीठाचे अधिक सेवन आपल्यासाठी किती घातक ठरु शकते. त्याचा अतिरेक झाला की हेच मीठ आपल्या मृत्यूचे कारण पण बनू शकते. पण यकृत, हृदय आणि थायरॉईड सारख्या अनेक अवयवांच्या सुरळीत कार्यासाठी मीठ आवश्यक आहे.अनेक लोकं जेवणात वरुन मीठ टाकून खातात. अशा लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होऊ शकतो. काय आहे मीठाच्या अधिक सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या.
केस गळणे
केस गळण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. पण जर तुम्हाला देखील केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही मीठाचे सेवन कमी केले पाहिजे. कारण, मिठालाच सोडियम आहे. ज्यामुळे केसांची मुळे जास्त कमकुवत होतात. ते गळतात आणि टक्कल पडतो.
किडनीची समस्या
आपण जर जास्त मीठ खालले तर आपल्याला अधिक घाम येतो. कॉलेस्टेरॉल वाढते. बहूतेकवेळा लघवीतून देखील जास्त पाणी जाते. यामुळे आपल्या किडनीला अधिक काम करावे लागते. यामुळेच किडनीचा त्रास होऊ शकतो.
त्वचा रोग
अनेक जणांना मीठाचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. खाज येण्यापासून ते त्वचेवर जळजळ होणे, लाल पुरळ येणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे. त्यामुळे त्वचा खराब होते. चेगऱअयावर डाग तयार होतात.
हाडे कमकुवत होतात
मीठ जर तुम्ही अधिक प्रमाणात खालले तर तुम्हाला हाडांमध्ये असलेले कॅल्शियम हळूहळू कमी होण्याची समस्या जाणवते. मीठामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि नंतर ही कमकुवतपणा ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारात बदलते.
रक्तदाब आणि हृदयरोग
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा देखील धोका असतो. उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणातील मीठाचे प्रमाण ताबडतोब कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाबामुळे हृदयवीिराराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराच्या लोकांना देखील मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.