डायबेटीस आणि साखर हे एक समीकरणच झालं आहे. सामान्य लोकांना असे वाटते की, डायबेटीस ही जास्त साखर खाल्ल्याने होते. पण हा प्रत्यक्षात एक भ्रम आहे. डायबेटीज होण्यामागचे मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. डायबेटीज कशी होते? त्याचे कारण काय? हे जाणून घेऊयात. डायबेटीज ही उच्च रक्तातील साखरेमुळे होणारा आजार असला तरी ती साखर खाल्ल्याने होऊ शकते का?, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की साखर खाल्ल्याने थेट डायबेटीज होऊ शकत नाही, परंतु त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो.
डायबेटीज कशी होते?
जेव्हा शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देणे थांबवते तेव्हा त्याचे पचण थांबते. त्यामुळे साखर ही थेट रक्तामध्ये जाते. त्यामुळे डायबेटीज होते. म्हणूनच WHO सांगते की, लोकांनी आपल्या दैनंदिन कॅलरीजपैकी 10% पेक्षा जास्त साखरेचा वापर करु नये.
या तीन कारणांमुळे डायबेटीज होते. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करणे थांबवते किंवा जेव्हा पेशी तयार होणाऱ्या इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात तेव्हा डायबेटीज होते. जर एखाद्याला मधुमेह झाला असेल तर त्याला साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखरेचे चयापचय करण्यासाठी इंसुलिनला कार्यक्षमतेने कार्य करावे लागते. त्यामुळे डायबेटीज झालेल्या रुग्णांमध्ये साखरेचे सेवन केल्यास ग्लुकोजची पातळी वाढते आणि त्यामुळे डायबेटीजशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे केवळ साखरच नाही तर सर्व पदार्थ ज्यामध्ये ग्लुकोज असते, त्यामुळे डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी नियंत्रित पद्धतीने याचे सेवन करावे.
खाल्ल्यानंतर साखरेची पातळी का वाढते?
खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखरेची पातळी वाढते. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर हे सर्वच लोकांमध्ये होते. पण जेव्हा हे घडते, तेव्हा स्वादुपिंडात दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया घडतात. इन्सुलिनचे उत्सर्जन आणि अमायलिन नावाचे संप्रेरक सोडणे.
अॅमलीन अन्नाला लहान आतड्यात जेथे बहुतेक पोषक द्रव्ये शोषली जातात तेथे खूप लवकर पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करते. बहुतेक वेळा, खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेमध्ये तात्पुरती वाढ होऊ शकते. ते लक्षातही येत नाहीत.