आपल्या शरीराला शक्ती देण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे फायद्याचे मानले जाते. गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. सांधेदुखी, कंबरदुखी यांसारख्या इतर अनेक समस्या दूर होऊ शकतात. इतकेच नाहीतर भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन अर्थात रक्ताभिसरण नियंत्रित करून शरीराला हार्ट अटॅकसोबत अनेक हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेऊ शकते.
लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन 6 मिळते. ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते. शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याचसोबत शरीराला ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते. रोज भिजलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे तुम्ही डायबिटीजसारख्या आजारापासून दूर राहू शकता. फायबरने भरपूर शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचनतंत्र चांगले राहते. थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि ऊर्जाही मिळते.
रोज मुठभर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कॅन्सरपासून दूर राहू शकतात. कारण, यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट, आयरन, नियासिन, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक शरीराला कन्सर सेल्ससोबत लढण्यास मदत करतात. थंडीमध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गूळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.