Pune Prime News : बदलती जीवनशैली, आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष या सर्व बाबींमुळे अनेक आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळत आहे. पण आपल्या निसर्गात अशा काही गोष्टी आहेत त्याने आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यापैकी एक म्हणजे केळी. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
केळीत आवश्यक पोषक घटक असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित करता येते. केळी खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो. केळ्यांमध्ये पेक्टीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं. अन्न पचन प्रक्रियेला मदत होते. फायबर शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करतं.
केळीमध्ये आढळणारे ट्रिप्टोफॅन हे अमिनो असल्याने ॲसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे मेंदूला शांत करण्यास मदत करते. हे तणाव दूर करते आणि उत्साही करते. तसेच केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे. केळ्यांमध्ये फायबर असल्याने ते खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं.