पुणे : ड्रायफ्रुट्स घालून दूध पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. अनेकांना दुधाची चव आवडत नाही म्हणून ते दूध पिणे टाळतात. अशा वेळी दुधात अंजीर, बदाम आणि मनुके टाकली तर त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते. हे दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तही वाढते.
बदाम-
बदाम हा प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. याशिवाय बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मनुका-
मनुक्यात अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी आवश्यक आहेत.अनेक पौष्टिक तत्व असलेल्या मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अशी पोषकमुल्याने ते समृद्ध असतात. याशिवाय मनुक्यामध्ये लोह आणि फायबर देखील आढळतात.
अंजीर-
अंजीरमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, तांबे यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असते. अंजीर प्रथिने आणि फायबरचा देखील चांगला स्रोत आहे.अंजीर हे फळ आणि ड्राय फ्रूट म्हणूनही खाल्ले जाते.