रक्तदाब असो वा मधुमेह याची पातळी नियंत्रितच असावी. कारण, जर याची पातळी जास्तही चालत नाही आणि वाढलेलीही चालत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. त्यात मधुमेहाच्या रुग्णांनी तळलेले पदार्थ टाळावेत. त्यात फॅटचे प्रमाण जास्त असते.
मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी मिठाई, चॉकलेट, साखरयुक्त पेय आणि इतर गोड पदार्थ टाळावेत. जर तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही फक्त गूळ आणि मध यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांपासून बनवलेले पदार्थ खावेत आणि तेही मर्यादित प्रमाणात. यामध्ये मिठाई खाणे हे रुग्णांसाठी विषासारखेच ठरू शकते.
तळलेल्या पदार्थात फॅट असते. त्यामुळे हे फॅट हळूहळू पचते. अशाने रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी तळलेले पदार्थ खाणे टाळावे. मधुमेह असलेल्या लोकांनी अल्कोहोल टाळावे. कारण ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात वाईट पदार्थांपैकी एक आहे. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने तुम्हाला कमी ग्लुकोज पातळीचा धोका असू शकतो.