आजकाल धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. तरूण असो किंवा इतर वयोवृद्ध व्यक्ती सगळेच तणावाचे आणि चिंतेचे बळी ठरत आहेत. तुम्ही तुमच्या घरात, शेजारच्या किंवा कुटुंबात कोणीतरी झोपेत ओरडताना नक्की पाहिलं असेल. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही Midnight Anxiety चं शिकार ठरू शकता.
Midnight Anxiety ही एक सामान्य समस्या जरी वाटत असली तरी त्याकडे योग्यवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. याची लक्षणेही अनेक आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल काळजीपूर्वक विचार करताना अस्वस्थता वाटणे, त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय, कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण, निद्रानाश यांसारखी याची लक्षणे असू शकतात.
या Midnight Anxiety ची कारणेही अनेक असू शकतात. त्यात जेव्हा तुम्ही काही कामाच्या संदर्भात खूप ताण घेत असाल, रात्रंदिवस एकाच गोष्टीचा विचार केल्याने मध्यरात्री पॅनिक अटॅक येऊ शकतात. तसेच जर तुमची झोपेची सवय चांगली नसेल तर तुम्ही मध्यरात्री चिंताग्रस्त अटॅकचा बळी होऊ शकता. याशिवाय, जे लोक काही मानसिक दबावामुळे किंवा काही वेदनादायक आजारामुळे किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या वियोगामुळे तणावाखाली असतात.
असा मिळवता येईल त्यापासून आराम…
Midnight Anxiety सामना करण्यासाठी सकाळ आणि रात्रीची दिनचर्येत व्यायाम समाविष्ट करा. याचा त्रास झालेल्या व्यक्तीला खूप फायदा होतो, कारण थकवा आल्याने चांगली झोपही लागते. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने लोकांचा दररोज त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार होतात. यासोबतच हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे दररोज 8 ते 10 तासांची झोप घ्या.