सुरेश घाडगे
परंडा : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा येथे ८ नोव्हेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवीणार आहे. अशी माहिती परंडा डॉक्टर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
परंडा शहरासह तालुक्यातील डॉक्टर संघटनेची आज बुधवारी (ता. १२ ) शासकीय विश्रामग्रह येथे बैठक झाली . त्यावेळी वरील माहिती परंडा डॉक्टर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, या मोर्चात सहभागी होण्यासाठी वकील संघटना, शिक्षक संघटना या सह विवीध संघटना पुढे सरसावल्या आहेत. सकल मराठा समाजाच्या महामोर्चास पाठीबा देऊन मोर्चा दरम्यानची सर्व सोईयुक्त अँब्युलन्स सह सर्व आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी डॉक्टर संघटनेने स्विकारली आहे. तसेच यावेळी मराठा आरक्षण महामोर्च्या यशस्वी होण्यासाठी मिळेल ती जबाबदारी स्विकारून काम करण्याचे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.