अनेकदा जास्त धावपळ केल्याने शरीर थकतं. त्यामुळे हातपाय दुखतात. ही एक सामान्य बाब आहे. मात्र, सातत्याने हे असं होतं असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागते. कारण, तुमचं अशाप्रकारे हातपाय दुखणे हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे असं काही वाटल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरु करावेत.
क्लॉडिकेशन ही एक समस्या असू शकते. अशावेळी मांडी आणि त्यासंबंधी इतर अवयव दुखू शकतात. कधीकधी यामुळे होणारी वेदना इतकी धोकादायक असू शकते. तुम्हाला चालणेही खूप कठीण होते. सामान्यत: जेव्हा तुम्ही चालता तेव्हा क्लॉडिकेशनची वेदना उद्भवते. पण ही वेदना विश्रांतीवर देखील निघून जाते. जसजसा रोग वाढत जातो, तसतसे थोडेसे चालणे देखील वेदनादायक होऊ शकते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
थायरॉईड ग्रंथीच्या समस्यांनी ग्रस्त लोक, विशेषत: हायपोथायरॉइडिझम, बऱ्याचदा वेदना सहन करतात. हायपोथायरॉइडिझमच्या बाबतीत, तुमची थायरॉईड ग्रंथी काही प्रमुख हार्मोन्स पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाही. यामुळे स्नायू आणि सांधे दुखण्यासोबत सूज येण्याची समस्या वाढू शकते.
तसेच तुम्हाला वारंवार थकवा जाणवू शकतो आणि काही लोकांमध्ये यामुळे स्मृती समस्या, केस पातळ होणे, कोरडी त्वचा, उच्च कोलेस्टेरॉल, हृदय गती कमी होणे यासारखी लक्षणे देखील होऊ शकतात. यातच जर तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या असतील तर त्यामुळे तुमचे अनेकदा हातपाय दुखू शकतात.