Pune Prime News : आपण आपले शरीर, शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घेत असतो. पण शरीरासह मानसिक स्वास्थ्य राखणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यानुसार, जीवनशैलीसह आहारातही बदल करावा लागतो. आहारात पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो.
तुमच्या आहारात ओट्स, बीन्स आणि सोयासारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या गोष्टींच्या सेवनाने मेंदूच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. जे नैराश्य आणि चिंतेमध्ये आराम मिळतो.
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फोलेट असते, जे नैराश्य आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यास मदत करते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात.
तसेच टोमॅटोचा लाल रंग त्यामध्ये आढळणाऱ्या फायटोन्यूट्रिएंट लाइकोपीनमुळे असतो. अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या मेंदूशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. या गोष्टींचा समावेश केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.