नवी दिल्ली : सध्या गाणी ऐकण्यासाठी, फोन करण्यासाठी हँड्स-फ्री अर्थात नेकबँड, इअरफोन, इअरबड यांसारखे गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व गॅजेट्स स्वस्तात उपलब्ध होत असल्याने याला पसंतीही चांगली मिळत आहे. असे असताना तुमच्या याच इअरबड्स, इअरफोनचा वापर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
हेडफोन वापरताना काही काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. हेडफोन वापरताना आवाज जास्त मोठा नसावा याची काळजी नक्की घ्यावी. हेडफोन नेहमी कमी आवाजात वापरा. जर कमी नसेल तर आवाज मध्यम ठेवा. खूप मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे टाळा. इयरफोन सतत वापरू नका. मधेच ब्रेक घ्या आणि कानाला विश्रांती देताना त्याचा वापर करा. याशिवाय, हेडफोन वापरण्यापूर्वी ते स्वच्छ करायला विसरू नका. संसर्ग टाळण्यासाठी ते नियमितपणे स्वच्छ करा. इतरांसोबत हेडफोन शेअर करणे टाळा.
हेडफोन्स बराच वेळ वापरल्याने समस्या उद्भवू शकतात. त्यात हेडफोन जास्त वेळ वापरल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. सततच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाची समस्याही उद्भवू शकते. हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर केल्यानेही कान दुखूही शकतात. यामुळे कानाला संसर्गही होऊ शकतो.
डोकेदुखीही होऊ शकते
हेडफोन्सचा सतत वापर केल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे मायग्रेनसारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. लक्ष केंद्रित करण्यात समस्या हे हेडफोनच्या दुष्परिणामांपैकी एक असू शकतात. हेडफोन वापरल्याने काम करताना किंवा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.