आपली स्मरणशक्ती चांगली असावी यासाठी आपण काहीना काही प्रयत्न करत असतो. त्यातच आपला बहुतेक वेळ तंत्रज्ञानामध्ये घालवला जातो. विशेषत: मोबाईल, लॅपटॉप हा आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसपासून घरापर्यंत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी स्क्रीन मोबाईल अथवा लॅपटॉप हा वापरला जातो. अशा स्थितीत डिजिटल डिमेंशियची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
डिजिटल डिमेंशिया म्हणजे काय?
मेंदूच्या विकारांचा एक समूह ज्यामध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे आणि दैनंदिन कामे करण्यात अडचण यांसारखी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात, त्याला स्मृतिभ्रंश म्हणतात.
डिजिटल डिमेंशिया का होतो?
स्मार्टफोनमुळे आपला मेंदू कमी सक्रिय होतो, मेंदूमध्ये एक प्रकारची सेन्सरी मिस मॅच होते, जी टेक्नॉलॉजीमुळे होते. फोन आणि एकाच आसनात बराच वेळ बसल्याने डिमेंशियाची लक्षणे जाणवू लागतात, जी डिजिटल आहे. फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर इत्यादींचा दिवसातून 4 तासांपेक्षा जास्त वेळ वापरल्याने डिजिटल डिमेंशियाचा धोका वाढतो. याचा फटका प्रौढांसोबतच मुलांनाही बसतो.
डिजिटल डिमेंशियाची लक्षणे काय?
– लहान गोष्टींबरोबरच मोठ्या कामांवरही लक्ष नसणे
– मुलांमध्ये भाषेचे मंद आकलन, कमी सक्रिय मेंदू आणि निष्क्रिय बसणे, यांमुळे मानसिक आणि शारीरिक विकासात अडथळा येतो.
– अल्पकालीन स्मरणशक्ती कमी होणे
– सहज गोष्टी विसरणे किंवा गमावणे
– शब्द किंवा गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण जाणवणे
– मल्टीटास्किंगमध्ये समस्या