Health tips : आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण नकळतपणे काही आजार बळावण्याची शक्यता असतेच. त्यामुळे वेळीच सतर्क राहणे गरजेचे बनते. मात्र, निरोगी आरोग्याचा एक कानमंत्र आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
निरोगी आरोग्यासाठी शांत झोप अत्यंत महत्त्वाची असते. रात्रीची शांत झोप घ्यावी. सात ते नऊ तासांची झोप शरीराला आवश्यक असते. पुरेशी झोप न घेतल्यास आपली कार्यक्षमता कमी होते. परिणामी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. तसेच दीर्घ श्वसनाचे व्यायाम प्रकार करावेत. शरीराला एक प्रकारची ऊर्जा देतात. यामुळे जास्तीत जास्त प्राणवायू आत येतो.
याशिवाय, रसायनांचे फवारे मारलेली फळे आणि भाज्यांचे सेवन करणे टाळावे. व्यवस्थित पाणी प्या आणि जास्तीत जास्त तंतूमय पदार्थांचा आहारात समावेश असू द्या. अधूनमधून स्पा थेरपी घ्या. सर्व स्नायूंना आराम देण्यास बॉडी मसाज मदत करतो. एक दिवस शुद्ध आहार घ्या. फळे आणि कच्च्या भाज्या खाव्यात. याने आरोग्य सुदृढ राहण्याचे मदत होते.