पुणे प्राईम न्यूज डेस्क: खजूर गोड असल्यामुळे तुम्ही आवडीने खात असाल. परंतु खजूर शरीरासाठीही अत्यंत पौष्टिक असतो. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक घटक असतात. मात्र खजूर खाताना आपण सहजपणे त्याच्या बीया फेकून देतो. पण तुम्हाला माहितेय का, खजूरच्या बीयाचेही अनेक फायदे आहेत.

खजूरच्या बीयांचे महत्त्वाचे फायदे:
1. नखांच्या मजबुतीसाठी फायदेशीर
नखं वारंवार तुटत आणि वेदना होत असतील तर खजूरच्या बीयांचे तेल नखांवर लावा. यामध्ये असलेल्या नैसर्गिक पोषणद्रव्याने आराम मिळेल. नखं मजबूत होण्यास मदत होईल.

2. त्वचेसाठी फायदेशीर
वयानुसार चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागते. अनेकदा सुर्कुत्याही दिसू लागतात. खजूरच्या बीयांमध्ये व्हिटॅमिन बी, ए आणि लोहासारखे घटक असल्याने त्वचेला पोषण मिळते. बियांचं तेल नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास सुर्कुत्या कमी होतात.

3. मुतखड्याच्या त्रासापासून आराम
खजूरच्या बीयांचं पाणी पील्याने मुतखड्याच्या आजारापासून आराम मिळण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
4. केस गळतीवर नियंत्रण
नेहमीचा तणाव आणि असंतुलित आहारामुळे केस गळण्याची समस्या वाढली आहे. केसांना खजूरच्या बीजाचं तेल लावलं असता केस गळती थांबवण्यास मदत होते.
5. ब्लड शुगरवर फायदेशीर
खजूरच्या बियांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे जे रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे बिया मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आलेली आहे. यातून पुणे प्राईम न्यूज कोणताही दावा करत नाही)







