Health : कामाचा ताण असो वा इतर काही कारणे अनेकांना डोकेदुखीची समस्या कधीना कधी तरी जाणवतेच. पण, ही समस्या जरी किरकोळ वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच लक्ष देऊन उपचार करणे योग्य ठरते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब करून ही डोकेदुखी कमी करता येऊ शकते.
पुदिन्याचा रस हा डोकेदुखीतही खूप फायदेशीर ठरतो. पुदिन्यात आढळणारे मेन्थॉल हा घटक डोकेदुखीपासून तात्काळ आराम देतो. पुदिन्याची काही पाने घेऊन त्याचा रस कपाळावर लावावा. यामुळे काही मिनिटांत डोकेदुखी कमी होऊ शकते. आले हे देखील डोकेदुखीवर गुणकार ठरते. डोक्यातील रक्तवाहिन्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. त्याच्या वापराने डोकेदुखी कमी होते. यासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून दिवसातून एक किंवा दोनदा प्यावा.
याशिवाय आल्याची पावडर किंवा कच्चे आले पाण्यात उकळून त्या पाण्याच्या सूर्यप्रकाशातून काही मिनिटे वाफवून घेतल्यास आराम मिळतो. गरम पाण्यात लिंबू घेणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून प्यावा. डोकेदुखी काही मिनिटांतच दूर होऊ शकते. त्यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.