फिट अर्थात तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच जीमचा देखील अनेकजण अवलंब करत असतात. पण तुम्ही देखील जीमला जात असाल तर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. जिममध्ये जाण्याअगोदर स्पोर्ट्स ड्रिंक पिऊ नका. यामध्ये साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. याचा परिणाम तुमच्या मेटाबायोलॉजीवर होऊ शकतो. त्यामुळे स्पोर्टस ड्रिंक टाळा आणि घरगुती ज्यूस प्या.
वर्कआउट सुरू करण्याआधी बॉडी वॉर्म करायला आणि वर्क आऊट झाल्यावर स्ट्रेचेस करायला अजिबात विसरू नका. वॉर्मअपमुळे आपण बॉडीला व्यायामासाठी तयार करत असतो. पुश अप्स, पूल अप्स, वॉक हे वॉर्मअपचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्ट्रेचेसमुळं हार्ड झालेले मसल्स नॉर्मल होतात. फ्लेक्झिबिलीटी वाढण्यास मदत होते. जीमला जाताना पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका. व्यायाम करत असताना शरीरातील पाण्याची पातळी कायम राहील याची काळजी घ्यावी लागते.
जीमला सुरूवात केल्यानंतर लगेच वेट्स उचलण्यासारखे व्यायाम अतिप्रमाणात करू नका. त्याऐवजी काही दिवस फक्त तीस ते पस्तीस मिनिटेच व्यायाम करा. कारण, शरीराला सवय नसल्यानं इजा होऊ शकते. जिमिंग सुरू करण्याआधी आणि जिमिंग झाल्यानंतर लगेच पाणी किंवा ज्यूस पिणे टाळा. क्षणभर विश्रांती घेऊन मगच पाणी प्यावे, अशा काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.