कोणत्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामाने आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहते. त्यामुळे वैद्यकीय अडचणी कमी प्रमाणात जाणवतात. पण आपल्या शारीरिक आजारांपैकी एक म्हणजे दम लागणे. जर तुम्हालाही या समस्या असतील तर वेळीच काळजी घ्या.
काही पायऱ्या चढल्याबरोबर आपण धापा टाकू लागतो. हे काही सामान्य लक्षण नाही आणि चांगलं तर मुळीच नाही. दम लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पोषक तत्वांची आणि उर्जेची कमतरता असणे. पुरेशी पोषक तत्त्वं मिळाल्यानंतरही शरीराच्या थोड्याशा हालचालीनंतरही लोकांना लगेच थकायला होतं. हे एखाद्या अंतर्गत आजाराचे लक्षणही असू शकते. निद्रानाश, मानसिक आजार आणि अशक्तपणा हेही त्यामागचे कारण असू शकते.
जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल आणि सकाळी उशिरा उठत असाल तर ही समस्या तुमच्या आरोग्यासोबतही होऊ शकते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. तसेच दररोज पुरेशी झोप घ्या. प्रौढ व्यक्तींनी कमीत कमी 8 तास तरी झोपले पाहिजे. निरोगी आहार घ्या, त्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश करावा. नियमित व्यायाम आणि योगासने करा, हे सर्व केल्यास यातून नक्कीच फायदा होऊ शकतो.