सध्या बहुतांश जणांचे बैठ अर्थात डेस्क जॉब असतो. त्यामुळे शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात होत नाही. या कारणामुळे शरीरात जी निष्क्रियता येते ती काही तास उभे राहून काम करून भरून काढता येते, असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. मात्र, तुमचं असं हे करणं आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं.
दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त उभे राहिल्याने डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरिकोज व्हेन्स सारख्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. जे लोक जास्त वेळ बसून किंवा उभे राहतात त्यांनी दिवसभर नियमित हालचाल करावी. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त वेळ उभे राहिल्याने बैठी जीवनशैली सुधारणार नाही आणि काही लोकांसाठी ते रक्ताभिसरणासाठी धोकादायक ठरू शकते.
दीर्घकाळ उभे राहिल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारत नाही. याउलट रक्ताभिसरण समस्यांचा धोकाही वाढतो. त्यामुळे तुम्ही उभं राहून काम करण्याचा विचार करत असाल तर ते थांबवणं गरजेचे आहे. त्याने तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.