अनेकांना उचकीची समस्या कधीना कधी भेडसावली असेल. पण ही उचकी जेव्हा येते तेव्हा काय करावं, काय नको असंच होत असतं. व्यक्तीला अस्वस्थ असं होत असतं. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास या उचकीचा त्रास थांबण्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
उचकी थांबवण्यासाठी अनेकदा पाणी प्यायले जाते. असे केल्याने आराम मिळवता येऊ शकतो. डायाफ्रँम आणि बरगड्यांमध्ये असलेल्या इंटरकोस्टल पेशी आकुंचन पावतात, तेव्हा उचकी लागून आवाज येऊ लागतो. उचकीच्या समस्येवर आलं फायदेशीर ठरते. आलं अतिशय गुणकारी असतं. ज्यावेळी अशी समस्या उद्भवेल तेव्हा आल्याचा एक तुकडा हळूहळू चावावा. यामुळे नक्कीच उचकी थांबू शकते.
तुम्हाला उचकीची समस्या जाणवू लागल्यास पाणी पित राहणं हा एक उत्तम पर्याय आहे. एक ग्लास पाणी प्यायल्यानंतरही उचकी थांबू शकते. इतकं करूनही उचकी न थांबल्यास गुळण्या केल्यास नक्कीच आराम मिळू शकतो. याशिवाय, एक चमचा काळी मिरीची पावडर घ्यावी आणि ती हुंगावी. शिंक येईपर्यंत ही क्रिया करत राहावी. शिंक आल्यास उचकी थांबू शकते.