Health : आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण अशा काही गोष्टी आहेत की त्या काही केल्या मागे हटत नाही. त्यात तुम्हाला जर सतत थकवा जाणवत असेल तर भरपूर पाणी तर प्याच शिवाय व्यायामही दररोज करा. त्याने तुमच्या आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो.
जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला अशक्त आणि थकल्यासारखं वाटतं. मानसिक दुर्बलता आणि सुस्तीही जाणवते. त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी पाणी प्या. दररोज किमान 3-4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. व्यायाम देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. व्यायामामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्यास शरीराला कमालीची मजबुती मिळते. त्यामुळे वजन कमी होते आणि काम करण्याची क्षमता वाढते.
जर तुम्हाला जिमला जाता येत नसेल तर घरीच व्यायाम करा. धावणे-चालणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे झोप. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर आणि जीवनावर दिसून येतो. पूर्ण झोपेशिवाय शरीर निरोगी राहत नाही. रात्री कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे थकवा दूर होतो आणि शरीर अॅक्टिव्ह राहते.