जेवणात काहींना तेलकट, चमचमीत खाणं आवडतं तर काहींना तिखट खाणं आवडतं. तिखट खाणं आवडत जरी असलं तरी त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचे आहे. कारण, जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यास काही समस्या निर्माणही होऊ शकते. त्यामुळे याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे, त्यांनी मिरची खाणे टाळले पाहिजे. विशेषतः लाल मिरची अजिबात खाऊ नये. अन्यथा पोटात जळजळ होण्याची समस्या आणि अॅसिडिटी जास्त वाढते. या व्यतिरिक्त, जे लोक जास्त मिरची खातात, त्यांना अतिसाराची समस्या देखील उद्भवू शकते. तिखट पदार्थामध्ये लाल मिरची आरोग्यासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरू शकते. जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही लाल मिरच्यांचे सेवन करणे टाळावे.
ज्यांना पोटात अल्सरची समस्या आहे, अशा लोकांनी मिरचीचे सेवन करू नये. मिरचीचा तिखटपणा जखमा अधिक खोल होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी मिरच्यांचे सेवन अजिबात सेवन करू नये. अन्यथा ही समस्या मूळव्याधाचे रूप धारण करते. त्यामुळे तिखट खाताना काळजी घेणेच फायद्याचे ठरू शकते.