पुणे: पावसाळा म्हणजेच आद्रतेचा हंगाम. या काळात अनेक महिलांना योनी संक्रमणाचा त्रास होतो. दमट हवामान, ओलसर कपडे, आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने यीस्ट इन्फेक्शन, बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस, किंवा इतर बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन्स होण्याचा धोका वाढतो.

पावसाळ्यात योनी संक्रमण का वाढते?
१) जास्त आद्रता आणि शरीरातील ओलसरपणा फंगल इन्फेक्शनसाठी पोषक ठरतो
२) ओलसर कपडे किंवा पॅड्स बदलण्यास वेळ लागल्यास संसर्ग होऊ शकतो

३) स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास बॅक्टेरिया वाढतात
४) संक्रमित पाण्याचा संपर्क हेही एक कारण असू शकते
लक्षणे :
१) खाज, जळजळ
२) पांढरट किंवा पिवळसर स्राव
३) दुर्गंधी येणे
४) लघवी करताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना
अशी घ्या काळजी:
१) पॅड्स वेळेवर बदला
२) सार्वजनिक टॉयलेट वापरताना स्वच्छता राखा
३) योग्य आहार आणि पाणी भरपूर प्या
४) तणाव कमी ठेवा आणि पुरेशी झोप घ्या
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे, ‘पुणे प्राईम न्यूज’ यातून कोणताही दावा करीत नाही.)







