Health Tips : कोणताही आजार असो त्यातून बरे होण्यासाठी औषधेही घेतली जातात. आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी औषधांचा संपूर्ण कोर्स किंवा दिलेल्या दिवसांपर्यंत औषधे घेणे आवश्यक असते. काही व्यक्तींना एकापेक्षा जास्त त्रास किंवा आजार असल्याने औषधयोजनाही वेगवेगळी असते. कोणताही आजार असो औषधे ही चुकीच्या पद्धतीने घेऊ नका.
आजारानुसार औषधे दूध किंवा पाण्याबरोबर घेण्याचा सल्ला दिला जातो. काही औषधे फक्त पाण्याबरोबर घ्यायची असतात. कारण दुधामधील कॅल्शिअम औषधांमधील काही घटकांच्या संपर्कात आल्यास त्याचा परिणाम कमी होतो. त्यामुळे तज्ञांनी दिलेल्या सूचना पाळून त्याप्रमाणे औषधे सेवन करावीत. काही औषधे जेवण करण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर घ्यायची असतात. कारण जेवणाच्या पदार्थातील घटक हे औषधाचा परिणाम कमी-जास्त करू शकतात.
एखादी व्यक्ती, दीर्घकाळापासून काही आजारांवर औषधे घेत असते. कालांतराने त्या आजाराची लक्षणे दिसेनाशी झाली की, औषध घेणे बंद करण्याचा विचार केला जातो. परंतु, असे करू नये. कारण बरेचदा औषधांच्या मदतीने आजार नियंत्रणात राहिलेले असतात. औषधे बंद केल्यास आजार पुन्हा उद्भवू शकतो.
औषधे घेतल्यानंतर शारीरिक श्रम करताना सावध राहावे. मुख्य औषधाबरोबर जीवनसत्व, खनिजे यांच्या गोळ्या घेऊ नये. तसेच मधुमेह, हाडे कमजोर होणे यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यताही यामुळे वाढते.