संदीप टुले : दौंड
Daund News : दौंड, (पुणे) : दौंड तालुका केमिस्ट संघटनेने दरवर्षीप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी बांधवांना मोफत औषधांचे वाटप केले. तसेच थकलेल्या माऊलींच्या पायाची मसाज करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. यावेळी त्यांना एकनाथ सीताराम दिवेकर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही मदत मिळाली. (Daund News)
वारकऱ्यांची मनोभावे सेवा..
कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. अमिता डोंगरे, ट्रस्टी योगिनी दिवेकर यांनीही वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. यामध्ये काही वारकरी बांधवांशीही संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘आम्ही दरवर्षी येथे आल्यानंतर मसाज करून घेतो व येथील लोकांकडून जी सेवा मिळते ती खरोखरच चांगली व मनोभावे असते. मसाजमुळे आलेला थकवा पूर्णपणे कमी होतो. त्यांनी यापुढेही अशाप्रकारे आलेल्या वारकऱ्यांची सेवा करावी, ही आशा आहे’. (Daund News)
यावेळी रोहिदास राजपुरे, दिगंबर खराडे, विशाल शेळके, रोहन कुंजीर, सचिन हेंद्रे, आप्पा सरगर, सौरभ दिवेकर, राजेंद्र वाघोले, अक्षय पितळे, भिवाजी शेंडगे, गणेश कुल, मोरेश्वर टेमगिरे, प्रकाश राऊत, विशाल ताकवणे, कृष्णा फरगडे, सुहास शितोळे, प्रदीप शेंडगे, दीपक चौधरी, विवेक भोसले यांच्यासह इतर केमिस्ट बांधव सेवेसाठी उपस्थित होते. (Daund News)