आपल्या स्वयंपाक घरात आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या अनेकदा पदार्थांकडे आपले दुर्लक्ष होते. त्यापैकीच एक म्हणजे, कढीपत्ता. आरोग्यासाठी गुणकारी असा कढीपत्ता आपण फोडणीसाठी हमखास वापरतो, काहीजण याकडे दुर्लक्षही करतात. आजपासूनच जेवताना कढीपत्त्याचा वापर करायला सुरुवात करा. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यासही कढीपत्त्याचा वापर करा. पण, तुम्हाला माहीत आहे का सकाळी अनोशापोटी कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे फायदे काय? जर नसतील तर जाणून घेऊयात…
केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर
कढीपत्त्याचे गुणधर्म केसांसाठी टॉनिकचं काम करतात. आहारतज्ञांच्या मते, हे केसांची मूळं मजबूत करण्यासाठी मदत करतात. केसांच्या वाढीसही कढीपत्ता फायदेशीर ठरतो. कमी वयातच तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर कढीपत्ता तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करतो. तसेच, टाळूचं पोषण देखील वाढवतो, केस चमकदार आणि मुलायम बनवण्यास फायदेशीर ठरतो.
पचनक्रिया सुधारते
कढीपत्त्यामध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. यामध्ये पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारे, एंजाइम असतात जे आतड्यांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.
मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स
कढीपत्त्याचं पाणी हा दिवसाची सुरुवात करण्याचा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग आहे. आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असं कढीपत्त्याचं पाणी शरीराला ऊर्जा देतं, पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यासही मदत करतं.
कोलेस्ट्रॉल कमी करा
कढीपत्ता हे अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि फिनोलिक कम्पाउंड यांसारख्या संरक्षणात्मक वनस्पती पदार्थांचं भंडार आहे. हे पदार्थ अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळीसारख्या समस्या कमी करून हृदय निरोगी ठेवू शकतात.
ताण – तणाव कमी करा
कढीपत्त्याच्या आनंददायी हर्बल सुगंधाचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच, कढीपत्त्याचं पाणी प्यायल्यानं स्नायू आणि मज्जातंतूंना आराम मिळतो, ज्यामुळे मनःशांती वाढते. यामुळे तणावापासून आराम मिळतो.
कढीपत्त्याचं पाणी कसं तयार कराल?
कढीपत्त्याचं पाणी तयार करणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी मुठभर कढीपत्त्याची पाने घ्या आणि गरम पाण्यात भिजत ठेवा. काही वेळ ठेवल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. कढीपत्त्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शरीरातील दूषित तत्व बाहेर टाकण्याचे काम कढीपत्त्याचे पाणी करते. यामध्ये व्यक्तींमध्ये गॅस्ट्रिक अस्वस्थता किंवा अॅलर्जीक रिअॅक्शनचा समावेश होतो.