(Corona Updates) नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. दिल्ली, राजस्थान, हिमाचल यांसारख्या अनेक राज्यांमध्ये, जिथे महिनाभरापूर्वीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती, तेथे संसर्गाच्या नवीन प्रकरणांमुळे चिंता वाढू लागली आहे. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार…!
गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९ संसर्गाचे ५ हजार ६७६ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर सोमवारी ही संख्या ५ हजार ८८० होती. यासह सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजारांच्या पुढे गेली आहे.
आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ०९३ झाली आहे. आतापर्यंत ४४,२००,०७९ लोक बरे झाले आहेत, ज्यामुळे बरे होण्याचा दर ९८.७३ टक्के झाला आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत २१ मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५३ हजार १०,०० वर पोहोचली आहे. आणि मृत्यू दर १.१९ टक्के नोंदवला गेला.