(Corona Updates) नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरात आता सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 32 हजारांच्या पुढे गेली आहे, ज्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३२ हजार ८१४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता 5 हजार 357 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या राज्यांमध्ये झाले सर्वाधिक मृत्यू…!
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी 11 कोरोनाबाधित लोकांना आपला जीव गमवावा लागला. यापैकी तीन गुजरातमधील, दोन हिमाचल प्रदेशातील आहेत. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि केरळमधील प्रत्येकी एका संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 4 कोटी 47 लाख 56 हजार 616 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी ०.०७ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ९८.७५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 1.19 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 220.66 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.