(Corona Update) नवी दिल्ली : सहा महिन्यांनंतर देशात कोरोनाचे 4 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी देशात 4 हजार 435 रुग्ण आढळले, तर 15 लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी 28 सप्टेंबर रोजी 4 हजार 271 प्रकरणे नोंदवली गेली होती. या दरम्यान 2 हजार 508 रुग्ण कोरोतून बरे झाले आहेत. सध्या देशभरात 23 हजार 091 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 18 ऑक्टोबरनंतरचे उच्चांकी कोरोना रुग्ण मिळाले आहेत. त्यानंतर 23 हजार 376 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत होते.
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 15 रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंपैकी 4 रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत, तर राजस्थान, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त केरळमधून 4 मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु हे बॅकडेटमध्ये आहे. म्हणजेच हे मृत्यू याआधीही घडले आहेत, ज्याची आज नोंद झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट…!
15 नोव्हेंबरपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. दैनंदिन प्रकरणे 500 च्या खाली घसरली आणि 30 जानेवारी रोजी सर्वात कमी 64 वर पोहोचली. हाच ट्रेंड फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत कायम राहिला, ज्यामध्ये रोजची प्रकरणे 200 ते 300 दरम्यान राहिली. पण, मार्च आला की, करोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली.
11 मार्च रोजी 500 हून अधिक कोरोनाची प्रकरणे मिळाली होती, हीच संख्या 21 मार्च रोजी अकराशेहून अधिक झाली. 28 मार्च रोजी 2 हजारांहून अधिक तर 29 मार्च रोजी 3 हजारांहून अधिक प्रकरणे प्राप्त झाली होती. आता 4 एप्रिल रोजी सुमारे 4500 रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या आकडेवारीवरून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे.