नवी दिल्ली : कोरोना संदर्भात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एका दिवसात ७ हजार ८३० लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, जे २२३दिवसांतील सर्वाधिक आहे. यासोबतच देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. आता देशात ४० हजार २१५ रुग्ण बाधित आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार , मंगळवारी २ लाख १४ हजार २४२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७ हजार ८३० लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या वाढत्या आकडेवारीवरून आरोग्य विभागाच्या चिंतेत भरे पडली आहे.
मृतामंध्ये दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये दोन संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये पाच मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 31 हजार 16 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Corona News : कोरोनाचा कहर यांना; मास्क लावणे सक्तीचे
Pune | जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक उत्पादन