मधुमेह, रक्तदाब ही समस्या आता फक्त वयोवृद्धांनाच नाहीतर अगदी तरूणांनाही सतावत आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. मधुमेहापासून दूर राहण्यासाठी व्यायाम प्रभावी उपाय ठरू शकतो. याशिवाय, तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
जेवणात मीठ घालण्याची सवय सोडून द्या. त्याचप्रमाणे मिठाईचे सेवन कमीत कमी प्रमाणात करा. रात्रीच्या वेळी आहारात मीठ आणि साखरेचा वापर पूर्णपणे टाळा. त्याऐवजी गुळाचे सेवन करा. मधुमेहापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान 30-40 मिनिटं शारीरिक हालचाली करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारखे व्यायाम केल्याने शरीरातून घाम येईल असा व्यायाम करा.
निरोगी आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजून घ्या. दिवसातून तीन ते चार वेळा कमी प्रमाणात खा. विशेषत: आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. अनेक प्रकारचे पोषण असल्याने ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. तळलेले, जंक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा. तसेच योग करणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो.