पुणे – काळे, जाड, लांब आणि सुंदर केस प्रत्येकाचे स्वप्न असते. आपले केस कसे आणि कोणत्या प्रकारचे आहेत, हे मुख्यत्वे आपल्या अनुवांशिकतेवर अवलंबून असते. अनेक प्रकारचे तेल आणि उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, परंतु आपण काही गोष्टी सेवन करून केसांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता….
१)प्रथिने समृद्ध आहार
आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्यानुसार आपले केस ९५% केराटीन आणि १५ अमीनो ॲसिडने बनलेले आहेत. म्हणून, आहारात प्रथिने समाविष्ट करणे हे केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यात मदत करते.यासाठी आपण अंडी, चिकन, दूध, पनीर, शेंगदाणे, दही, क्विनोआ खाऊ शकता. त्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते.
२)बदाम आणि केळीची स्मूदी
डॉ.अबरार मुल्तानी यांनी सांगितले की केसांच्या आरोग्यासाठी बदाम आणि केळी फायदेशीर मानली जातात. बदाम केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते कारण ते जस्त, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज सारख्या गुणधर्मानी समृद्ध असते. बदामामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई केराटिनचे उत्पादन वाढवून खराब झालेले केस दुरुस्त करण्यास उपयुक्त ठरू शकते, तर केळीमुळे केसांचे पोषण होण्यासाठी कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळते.
३)कोरफड रस सेवन करा
कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण कोरफडमध्ये प्रोटियोलिटिक एंजाइम चांगली मात्रा असते, ज्यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि केसांच्या रोमची दुरुस्ती होऊ शकते, परिणामी केसांची जलद वाढ होते. कोरफडचा रस घेऊन दिवसाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला जातो.
४)मेथी मसाला सेवन करणे
मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखे आवश्यक खनिजे असतात. हे सर्व पोषक घटक केसांच्या समस्यांचे उपचार करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहित करण्यासाठी फायदेशीर आहे. आपण एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्या दिवशी सकाळी खाऊ शकता.https://zeenews.india. com/hindi/health/hair-health- tips-eating-these-foods-will- make-hair-soft-and-long- healthy-hair-brmp/940747