सकाळचा नाष्टा चांगला आणि पोषक घटकांनी समाविष्ट असलेला असा केल्यास दिवसभर चांगली ऊर्ज मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे सकाळचा नाष्टा चांगला असेलच अशी खात्री करून घ्या. मात्र, असे काही पदार्थ आहेत ते सकाळी उठल्यावर उपाशीपोटी खाल्ल्यास तुम्हाला शक्ती तर मिळेल शिवाय आजारांपासूनही दूर राहता येऊ शकेल.
जर तुम्ही बदाम, काजू, मनुका आणि अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर ते फायदेशीर ठरते. भिजवून खाल्ल्यास अधिक फायदे मिळू शकतो. जर तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन केले तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. जर तुम्ही पीनट, काजू आणि बदाम बटर यासारखे नट बटर रिकाम्या पोटी घेतले तर ते फायदेशीर ठरेल. त्यांच्यातील हेल्दी फॅट्स शरीराला दिवसभर सक्रिय ठेवतात आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर करतात.
याशिवाय, भाज्यांचा रसही आरोग्यदायी मानला जातो. या भाज्यांच्या रसात फायबर आणि मिनरल्सने समृद्ध असलेला हा रस पचनसंस्था मजबूत करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. तसेच दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन केली तर उत्तम. कोमट पाणी चयापचय वाढवण्यासाठी आणि पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने ॲसिडिटीही दूर होते.