पुणे : आहाराच्या चुकीच्या व बदललेल्या सवयी, फायबरयुक्त अन्नाची कमतरता, पाणी कमी पिणे आणि नियमित शौचास न जाणे यामुळेही बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढत आहे. बध्दकोष्ठते प्रमाण लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहे.
बद्धकोष्ठता ही आरोग्यविषयक समस्या असून बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. मल विसर्जन न होणे. अथवा संघर्ष करावा लागतो. बाहेरील अन्नाचे सेवन, आहारात अल्प प्रमाणात फायबर, पुरेसे पाणी न पिणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या आढळून येते. जर वेळीच घेतले नाहीत तर पोटदुखी आणि भूक न लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठीचे उपाय…
-फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.
– दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाली, व्यायाम करावा.
– शौचालयाच्या दिनश्चर्येचे पालन करावे जेणेकरून आतड्यांचे आरोग्य चांगले राहील.
– पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे.
(टीप: सदरची माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे. तज्ञांचा सल्ला घ्यावा)