आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे अनेकांकडून प्रयत्न केले जातात. पण काही कारणास्तव काहींना हे जमत नाही. परिणामी, गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. त्यात फुफ्फुसाची काळजी कशी घ्यावी हे अनेकांना माहिती नसते. आता फुफ्फुसावर ताण न देताच ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करता येणार आहे. इतकेच नाहीतर तुम्ही फुफ्फुसाला साफही करू शकता.
सध्याच्या घडीला धुम्रपान करणाऱ्यांची फुफ्फुसे कमकुवत झाल्याचे समोर आले आहे. प्रदूषणामुळे त्यांची शक्ती कमी झाली आहे. असे लोक काही काम करताच धाप लागण्याची समस्या उद्भवू शकते. श्वास घेण्यात अडचणही येऊ शकते. हळूहळू फुफ्फुसे त्यांची क्षमता गमावू लागतात आणि ते पूर्णपणे विस्तारू शकत नाहीत आणि ऑक्सिजनने भरू शकत नाहीत. परंतु, तुम्ही त्यांना स्वच्छ करू शकता. ज्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या लवकर दूर होऊ शकते. स्टीम थेरपी घेणे हा फुफ्फुस स्वच्छ करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. वाफेमुळे श्वसननलिका सैल होतात आणि कफ पातळ होऊन बाहेर पडतो. यामुळे जळजळ कमी होते आणि श्वसनाच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.
तसेच आपल्या आहारात बेरी, पालक आणि हळद यांसारखे पदार्थ समाविष्ट करा. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे फुफ्फुसांना जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. हे श्वसन आणि श्वसनाचे आरोग्य सुधारते. दीर्घ श्वासाने फुफ्फुसे मजबूत होतात. या व्यायामामध्ये ते पूर्णपणे उघडतात, ज्यामुळे आतमध्ये जास्त ऑक्सिजन येतो. दररोज असे केल्याने श्वसनाचे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते.